Price: ₹191.49
(as of Nov 06, 2023 22:39:52 UTC – Details)
From the Publisher
Amazon Success Secrets: Jeff Bezos Success Story
स्मार्टफोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? अर्थातच नाही… पण द्रष्ट्या जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून १९९४ मध्ये ई कॉमर्स व्यवसायात पदार्पण केलं.
त्यावेळी वार्षिक २३०० टक्क्यांहून अधिक वेगानं वाढणारं इंटरनेट हेच जगाचं भविष्य असणार आहे हे अचूक ओळखणारी जेफ ही जेमतेम २५ वर्षांहून कमी कालावधीत पृथ्वीतलावरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरली.
हवं तेव्हा Amazon च्या व्हर्चुअल ट्रॉलीत पाहिजे ती वस्तू टाकणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील कुणाही व्यक्तीसाठी आता जेफ हे नाव अनोळखी नाही. याच नावानं किंडल. Alexa अशा असंख्य नवीन शब्दांना जागतिक शब्दकोशात मानाचं स्थान मिळवून दिलं. आपल्या द्रष्ट्या कामगिरीने पृथ्वीवर राज्य करणारा जेफ सध्या ‘ब्लू ओरिजिन’ या आपल्या महत्त्वाकांक्षी कंपनीद्वारे अंतराळ पर्यटनाचं स्वप्न मानवी कवेत घेऊ पाहतोय. त्याशिवाय संपूर्ण मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या कित्येक नवनवीन गोष्टींवर त्याचं सातत्यानं काम सुरू आहे.
Amazon च्या झंझावाती वाटचालीची कहाणी सांगणारं हे पुस्तक जेफ बेझोसच्या व्यक्तिमत्त्वाचे असे कित्येक पैलू सविस्तरपणे मांडतंच; पण त्याचबरोबर त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्राहकाकडे पाहण्याची नवी दृष्टीही प्रदान करतं.
शाळकरी वयाचा एक मुलगा ‘अपोलो – 11’ हे चंद्रयान 1969 साली
चंद्रावर उतरले त्याची माहिती वाचत होता. रेडिओवर ऐकत होता. आणि
त्याकाळी अत्यंत प्राथमिक अवस्थेत असलेल्या दूरचित्रवाणीवर पाहत होता.
आपणही एक दिवस चंद्रावर जायचे, अंतरिक्षातील अन्य ग्रहांवर जायचे हे स्वप्न
तो त्यावेळेपासून पाहू लागला. स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. पण त्या स्वप्नांचा
पाठलाग करून त्यांना सत्यात उतरवण्याचे मात्र फारच थोड्या लोकांना जमते.
अशा दुर्मीळ लोकांपैकी एक आहे, जेफ बेझोस.
आपले काम, आपला व्यवसायही अॅमेझॉनप्रमाणेच संपूर्ण जगात मोठा
होणारा व्यवसाय आहे. अॅमेझॉनसारखाच त्याचा पसारा अनेक देशांतून पसरणार
आहे. हे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करणार्या जेफला हे नाव खूप अर्थपूर्ण वाटले.
आणि ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ ची सुरुवात झाली.
सुधीर सेवेकर
सुधीर सेवेकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यानुभव आहे. गेली 40 वर्षे ते विविध माध्यमांतून लेखन करीत असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विशेषत: उद्योजकीय चरित्रलेखनात त्यांचा हातखंडा आहे. रंगभूमीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. जगाच्या विविध भागांत गेली अनेक वर्षे त्यांनी नोकरी आणि पर्यटनाच्या निमित्ताने विस्तृत भ्रमण केले आहे.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (15 December 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 224 pages
ISBN-10 : 9352203437
ISBN-13 : 978-9352203437
Item Weight : 230 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book