How To Enjoy Your Life And Your Job Book in Marathi, Dale Carnegie Books, डेल कार्नेगी बुक, मराठी अनुवादीत पुस्तक, बुक्स, dell karnegi, Del Lok Vyavhar लोक व्यवहार पुस्तके, पुस्तकं Best, Bestseller
Price: ₹129.00
(as of Nov 04, 2023 10:53:15 UTC – Details)
डेल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. या पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील. आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं. स्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं. कंटाळा आणि नैराश्यावर मात करणं. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं. आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.
From the Publisher
How To Enjoy Your Life And Your Job Book in Marathi
डेल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.
या पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं. स्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं. कंटाळा आणि नैराश्यावर मात करणं. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं.
आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.
‘‘तुम्ही जे काही करत आहात त्यावर तुमचा विश्वास असेल तर ते करण्यात कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घ्या. जगातील अनेक उत्कृष्ट कामे, जी सुरुवातीला अशक्यप्राय वाटत होती ती योग्य अशी काळजी घेतल्याने व्यवस्थितरीत्या पार पडली आहेत. हाती घेतलेले काम तडीस नेणे हीच महत्त्वाची बाब आहे.’’ – डेल कार्नेगी
डेल कार्नेगी यांच्या विचारातील सुलभता आणि स्पष्टता ही गेली कित्येक वर्षे वाचकांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात सातत्याने व प्रभावीपणे मार्गदर्शक ठरत आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या मानसशास्त्राचे अचूक आकलन असल्याने त्यांनी वाचकांना आत्मविकास साधण्यासाठी जीवनात सम्यक निर्णय घेण्याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्यातील उपजत क्षमतांचा पूर्णत: विकास करून त्यांचा उपयोग परिपूर्णतेने कसा करावा याविषयी ते नेटकेपणाने सांगतात. मग ते विक्री कौशल्य असो की संप्रेषण असो, विपणन असो की सुखसमाधान. कार्नेगी हे वाचकांना आपल्या सर्वच क्षमतांचा वापर करून आपल्यातील सुप्त गुणांची प्राप्ती कशी करावी याविषयी सांगतात.
कार्नेगी यांच्या लिखाणाचे विशेष संकलन असलेले हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपले यश सुनिश्चित करा.
तुम्ही या जगात काहीसे नवीन आहात त्याचा आनंद माना. निसर्गाने तुम्हाला जे दिलं आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या. या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष एकच आहेे की, कला ही आत्मचरित्रात्मक असते. तुम्ही तेच गाऊ शकता जे तुमच्यात आहे. तुम्ही तेच रंगवू शकता जे तुमच्यात आहे. तुमचे अनुभव, तुमची परिस्थिती आणि तुमचा अनुवंश यांनीच तुम्ही बनला आहात. चांगल्यासाठी किंवा वाइटासाठी तुमची स्वत:चीच बाग तुम्हाला फुलवायची आहे. भल्याबुर्यासाठी जीवनाच्या वाद्यवृंदात तुमचं लहानसं वाद्य तुम्हाला वाजवायचं आहे.
‘सेल्फ रिलायन्स’ या निबंधात इमर्सन म्हणतात, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात शिकताना अशी एक वेळ निश्चितपणे येते जेव्हा त्याला समजतं, की द्वेष हे अज्ञान आहे, नक्कल ही आत्महत्या आहे, त्याच्या वाट्याला जे काही चांगले-वाईट आहे ते त्याला स्वीकारावंच लागतं; जरी हे विशाल जग चांगुलपणाने भरलेलं आहे तरी त्याच्या वाट्याचं फळ त्याला तेव्हाच मिळेल जेव्हा तो स्वत: परिश्रम करेल. त्याच्या अंगी जी शक्ती आहे तिचं स्वरूप नवीन आहे आणि इतर कुणी नाही, फक्त ज्याचं त्यालाच हे कळतं, की तो काय करू शकतो आणि हे त्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तो स्वत: प्रयत्न करत नाही.’’
इमर्सनने ही गोष्ट या पद्धतीने सांगितली. तथापि हीच गोष्ट काव्यरूपानेही सांगितली आहे ती स्वर्गीय डग्लस मॅलक यांनी.
ते म्हणतात,
‘जर तुम्हाला पर्वताशिखरावरील देवदार होता येत नसेल
तर तुम्ही दरीतील एक झाड व्हा
पण ओढ्याकाठचं सर्वोत्तम झाड व्हा.
जर तुम्हाला झाड होता येत नसेल तर झुडूप व्हा
झुडूप होता येत नसेल तर गवत व्हा
आणि एखाद्या वाटेवर आनंद वाटत राहा.
जर तुम्हाला मोठा मासा होता येत नसेल,
तर छोटा मासा व्हा
पण तळ्यातला सर्वांत चपळ मासा व्हा.
आपण सर्वच काही नायक होऊ शकत नाही
काहींना सेवकही व्हावं लागतं.
आपणासाठी येथे आहे, काही ना काही करण्यासारखं,
मोठी कामं आहेत आणि आहेत छोटीही,
आणि आपल्या जवळच आहे जे करायचं ते.
तुम्हाला राजमार्ग होता येत नसेल, तर पायवाट व्हा
सूर्य होता येत नसेल, तर चांदणी व्हा
तुमच्या आकारावरून ठरत नसते तुमची हार-जीत
ज्याची निवड कराल, त्यात सर्वश्रेष्ठ व्हा!
डेल हर्बिसन कार्नेगी
(24 नोव्हेंबर 1888 ते 1 नोव्हेंबर 1955)
सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि वक्ते. स्वयंविकास, विक्रीकला, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्राविषयीचे शिक्षण, वत्तृत्वकला, व्यक्ती-व्यक्तीअंतर्गत असणार्या संबंधातले कौशल्य, भाषण कौशल्य असे अनेक लोकप्रिय अभ्यासवर्ग चालवणारे ते प्रशिक्षक होते. त्यांचा जन्म मिसोरीच्या एका मळ्यामध्ये गरीब कुटुंबात झाला. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ (1936) आणि ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ (1948) अशा अनेक व्यक्तिमत्त्व विकासविषयक लोकप्रिय पुस्तकांचे ते लेखक आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2022); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 184 pages
ISBN-10 : 9352203496
ISBN-13 : 978-9352203499
Reading age : 15 years and up
Item Weight : 250 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book