Tue. Dec 3rd, 2024
Maze Satyache Prayog, The Story of My Experiments With Truth in Marathi Books, Mahatma Gandhi Autobiography, Biography Book, महात्मा गांधी mk Gandhiji


Price: ₹200.00
(as of Nov 06, 2023 18:45:41 UTC – Details)


From the Publisher

Satyache Prayog Athva Aatmakatha: My Experiments with Truth by Mohandas Karamchand Gandhi

Satyache Prayog Athva Aatmakatha: My Experiments with TruthSatyache Prayog Athva Aatmakatha: My Experiments with Truth

‘गांधी’ समजून घेणे अगदी सोपे आहे आणि तितकेच अवघडही आहे. ‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजींनी लिहिलेले आहे: ‘‘मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे. एकन् एक भावना तपासली आहे, तिचे पृथक्करण केले आहे; परंतु त्यावरून निघालेली अनुमाने सर्वांच्याच बाबतीत अखेरची आहेत किंवा खरी आहेत किंवा ती तेवढीच खरी असा माझा मुळीच आग्रह नाही. एवढे मात्र मी आवश्य म्हणतो, की माझ्या दृष्टीने ती खरी आहेत आणि तूर्त तरी अखेरचीशी वाटतात.’’ गांधीजी असा स्वत:च्याच मनाचा तपास करतात आणि तो एकाटपणे नाही तर समूहात राहताना करतात. त्यामुळे इतर व्यक्तींची निरीक्षणे, अनुमाने, तीही खरी असण्याची वास्तविकता गांधीजी मान्य करतात. तसेच परिवर्तन- बदल यांचीही दखल घेतात. गांधीजी मानवी मन, जीवन व समाजवास्तवाचे निरीक्षण करतात, पृथ:करण करतात व अनुमाने काढतात. विनम्रपणे त्यांच्या मर्यादाही सांगतात; परंतु ते त्यांच्या तपासातूनच त्यांना पटलेल्या गोष्टी ग्र्राह्य मानतात व त्या अनुरूप वर्तन निश्चित करतात आणि ते वर्तनही ते त्यांच्या बुद्धीचे व आत्म्याचे समाधान करणारे राहील याचे सतत भान ठेवतात. याचे शुभ परिणाम होतील याची त्यांना मनापासून खात्री आहे. गांधी सत्याचा शोध असा घेतात. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचे अर्धशतक हा गांधीजींच्या जीवनाचा कालखंड आहे. या कालखंडातील जागतिक समाजवास्तव व भारतीय समाजवास्तव यांचा गांधीजींनी अभ्यास केला. सूक्ष्म निरीक्षण, व्यापक सखोल चिंतन, दूरदृष्टी, क्रतस्थ आचरण, जनकल्याणकारी निसर्गरक्षण, संवर्धनकारी दृष्टिकोन… गांधीजींच्या अभ्यासाचे हे विविध आयाम वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘सत्याचे प्रयोग’ वाचताना हे प्रकर्षाने जाणवते, समाजवास्तवाचा विचार करताना समाजव्यवस्थांचा विचार करावा लागतो. या समाजव्यवस्थांतून दर्शन होणार्‍या मानवी विश्वाचा, निर्माण होणार्‍या मानवी जीवनशैलीचा सांस्कृतिक विचार करावा लागतो. गांधीजींच्या सत्यशोधनात या सगळ्या बाबींचा विचार झालेला आहे.

-शोभा श्रीराम,

सचिव – महात्मा गांधी स्मारक निधी, गांधी भवन, औरंगाबाद.

सदस्य – नयी तालीम समिती, सेवाग्राम, वधा

या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.

– महात्मा गांधी

या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचा उपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. कारण, की सांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहे ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वत:ला मोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:ला लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की:

मौ सम कौन कुटिल खल कामी?

जिन तनू दियो ताहि बिसरायो

ऐसो निमकहरामी ।।

– महात्मा गांधी

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Twelfth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 376 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865439
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865431
Item Weight ‏ : ‎ 320 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *