Tue. Dec 3rd, 2024
Nelson Mandela: Conversations With Myself – Book in Marathi Autobiography नेल्सन मंडेला आत्मकथा Biography Books मराठी चरित्र पुस्तके पुस्तक बुक आत्मचरित्र पुस्तकं बुक्स Famous Only + Charitra


Price: ₹351.91
(as of Nov 07, 2023 09:43:14 UTC – Details)


From the Publisher

Nelson Mandela: Conversations With Myself by Nelson Mandela

Nelson Mandela: Conversations With MyselfNelson Mandela: Conversations With Myself

‘स्वत:शी संवाद’ या पुस्तकाद्वारे वाचकांना जनमानसात लोकप्रिय असलेले मंडेला व्यक्तिगत आयुष्यात कसे होते, हे समजून घेण्याची संधी मिळेल. ही पत्रं मंडेलांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या तुरुंगवासाच्या अंधकारमय कालखंडात लिहिली. या पत्रांद्वारे त्यांनी आपल्या ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या आत्मचरित्रात सांगायच्या राहून गेलेल्या बाबींची जणू पूर्तताच केली. या दृष्टीने हे पुस्तक एका अर्थी या आत्मचरित्राचाच पुढचा भाग म्हटला पाहिजे. इथे रॉबेन आयलंडच्या तुरुंगात आपल्या टेबलवरच्या दैनंदिनीत नोंदी करणारे, कधी भेटीदरम्यान कागदावर नुसतेच रेघोट्या मारणारे, तर कधी आपल्या खडतर स्वप्नाला चिरस्थायी रूप देण्यासाठी धडपडणारे मंडेला आपल्याला भेटतात. या पुस्तकात मंडेलांनी 1960 च्या दरम्यान सरकारच्या वर्णद्वेषी धोरणाविरुद्ध भूमिगत राहून केलेल्या कारवायांदरम्यानच्या नोंदी आढळतात; तसेच मित्रांबरोबर केलेल्या जवळ-जवळ सत्तर तासांच्या संभाषणाचा ध्वनिमुद्रित भागही आढळतो. या पुस्तकाच्या पानापानातून हेच जाणवते की, मंडेला म्हणजे कुणी देव वा साधुसंत नाहीत, तर तुमच्या आमच्यासारखेच माणूस आहेत.

या पुस्तकात मंडेलांचा पहिल्या राजनैतिक जागृतीच्या क्षणापासून ते जगाच्या इतिहासात उलथापालथ घडविण्याच्या भूमिकेपर्यंतचा जीवनप्रवास आपल्याला जवळून पहायला मिळतो.

‘‘माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्यावर जवळपास दोन दशकांनंतर मी रॉबेन आयलंड येथे मंडेलांच्या पूर्वाश्रमीच्या तुरुंगात उभा होतो. तिथे उभा असताना मी स्वत:ला राष्ट्राध्यक्ष मंडेला ‘कैदी क्र. 466/64’ असतानाच्या कालखंडात मागे नेले. त्या काळात त्यांच्या लढ्याला यश मिळण्याची पुसटशीही शक्यता वाटत नव्हती. मी स्वत: मंडेलांचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करत होतो. एक असा माणूस ज्याने दंतकथा बनून जगाचा इतिहासच बदलवून टाकला आणि या बदलासाठी त्याने स्वत:च्या सुखांची होळी केली. ‘संवाद स्वत:शी’ या पुस्तकाने मंडेलांमधील त्याच माणसाचे यथार्थ दर्शन घडवून फार मोठे योगदान दिले आहे.’’

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 464 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352202503
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202508
Item Weight ‏ : ‎ 410 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *