Price: ₹99.00
(as of Nov 05, 2023 18:58:13 UTC – Details)
From the Publisher
Ratan Tata by Sudhir Sevekar
‘‘आमच्यासाठी दोन दिशादर्शक काटे आहेत. एक काटा परदेशांकडे रोखलेला आहे. परदेशी बाजारपेठांत प्रवेश करणे, तेथील आपला वाटा वाढविणे आणि टाटा उत्पादनांना परदेशी बाजारपेठांतून सन्मानाचे भरीव स्थान मिळवून देणे, याकडे हा काटा निर्देश करतो.
दुसरा काटा भारतावरच रोखलेला आहे. भारतात फार मोठी बाजारपेठ उदयाला येत आहे. या फार मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष उत्पादने विकसित करणे, त्यासाठी यापूर्वी कोणीही उचलली नसतील, अशी आवश्यक ती पावले उचलणे, दुसर्यांचे अनुकरण करणे किंवा त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत चालणे यापेक्षा आपला स्वतंत्र मार्ग स्वत: तयार करणे यावर आमचा भर असेल.
अशा प्रकारे एकाच वेळी परदेशी बाजारपेठ आणि भारतीय बाजारपेठ अशा दोन्हींसाठी टाटा उद्योगसमूह कार्यरत असेल.’’
– रतन टाटा
सुमारे 150 वर्षांची उद्योग पंरपरा असलेल्या टाटा गु्रपचा अध्यक्ष होणे हा खर्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा गु्रपला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. टाटा गु्रपची विश्वसार्हता जपत त्यांनी टाटा गु्रपचा विस्तार केला.
रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय आढव्य असलेल्या टाटा गु्रपमध्ये सळसळते चैतन्य निर्माण केले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणार्या यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबर देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे चालवली आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची कार तयार करण्याचा संकल्प करून, तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे.
रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकिर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.
सुधीर सेवेकर
सुधीर सेवेकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यानुभव आहे. गेली 40 वर्षे ते विविध माध्यमांतून लेखन करीत असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विशेषत: उद्योजकीय चरित्रलेखनात त्यांचा हातखंडा आहे. रंगभूमीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. जगाच्या विविध भागांत गेली अनेक वर्षे त्यांनी नोकरी आणि पर्यटनाच्या निमित्ताने विस्तृत भ्रमण केले आहे.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Tenth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 8177865099
ISBN-13 : 978-8177865097
Item Weight : 180 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book