Price: ₹170.00
(as of Nov 07, 2023 15:55:16 UTC – Details)
From the Publisher
Steve Jobs (स्टीव्ह जॉब्स): Jag Badalnara Genius by Mamata Jha
स्टीव्ह जॉब्ज हा अशा महान अमेरिकन संशोधकांपैकी एक होता ज्यानं नेहमीच इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार केला. आपण हे जग बदलू शकू असा त्याला विश्वास होता आणि तसं करण्यासाठी आवश्यक असलेली असामान्य प्रतिभाही त्याच्यात होती.
– बराक ओबामा
· स्टीव्ह जॉब्ज हा थॉमस एडिसननंतरचा सर्वांत महान संशोधक होता.
– स्टीव्हन स्पीलबर्ग
· मी त्या निवडक भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांना स्टीव्हबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
– बिल गेट्स
· स्टीव्ह जॉब्ज हा कॉम्प्युटर युगाचा मायकल अँजेलो होता. त्यानं हे सिद्ध करून दाखविलं की, प्रतिभावान व्यक्तींसाठी महागडं आणि अभिजात शिक्षण हे आवश्यक असतंच असं नाही.
– नारायण मूर्ती
· जगानं एका द्रष्ट्या व्यक्तीला गमावलं आहे, तंत्रज्ञानजगतानं एक महारथी गमावला आहे तर मी माझा मित्र गमावला आहे. भावी पिढ्या स्टीव्ह जॉब्जनं केलेलं महान कार्य नेहमीच स्मरणात ठेवतील.
– मायकेल डेल
· स्टीव्ह जॉब्ज ही कित्येक शोध लावणारी आणि कमालीची प्रतिभा लाभलेली महान व्यक्ती होती. त्याला अतिशय कमी शब्दांत हे सांगण्याची कला अवगत होती की, आपल्यापैकी प्रत्येकानं नेमका कसा विचार करायला हवा.
– लॅरी पेज
· स्टीव्ह, माझा मार्गदर्शक आणि मित्र असल्याबद्दल धन्यवाद. तू जी उत्पादनं बनवलीस त्यांच्यात जगाला बदलून टाकण्याची क्षमता आहे. मला नेहमीच तुझी उणीव भासेल.
– मार्क झुकेरबर्ग
· स्टीव्ह जॉब्ज हा आपल्या पिढीतील एक महान सी.ई.ओ. (मुख्य कार्यकारी अधिकारी) होता.
– रूपर्ट मर्डोक
आजच्या युगात कॉम्प्युटर हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. या संगणक युगात वेगाने जी गुणात्मक प्रगती झाली त्यात स्टीव्ह जॉब्जचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. स्टीव्हला कॉम्प्युटर तंत्रज्ञानातील मायकेल एंजेलो म्हटले जाते. त्याने ज्या उपकरणांचा शोध लावला आणि प्रसार केला. त्यात असलेल्या योग्य त्या सुविधा आणि साधनांचा सहज वापर व कलात्मकरीत्या केलेलं सादरीकरण अत्यंत महत्त्वाचं होतं.
लहान आकारातले कॉम्प्युटर्स असो की संगीत ऐकण्याचे यंत्र, मोबाइल असो की अगदी टॅब्लेट संयंत्र स्टीव्हने निर्मिलेल्या वस्तूंमुळे इतर सर्व वस्तू कालबाह्य ठरल्या आणि हे यांत्रिक जग आनंदानं स्टीव्हच्या मार्गाचं अनुसरण करू लागले. आयुष्यात यापेक्षा अधिक यश काय असू शकतं.
कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात उत्पादन आणि सेवेच्या उत्कृष्टतेसाठी योजना आणि रणनीती तर प्रत्येकजण आखतो; पण जसे स्टीव्ह जॉब्जने आपली रुची आणि बुद्धिमत्तेच्या बळावर आपल्या उपकरणाला जगभरात प्रसारित करून प्रसिद्धी मिळवून दिली. तशी फार कमी लोक आहेत. जेव्हा स्टीव्हने कॉम्प्युटर जगतात प्रवेश केला त्यावेळी अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात आपला व्यवसाय आधीच प्रसारित करून नावलौकिक मिळवलेला होता. स्टीव्ह जॉब्जने सर्वप्रथम त्यांच्या कमकुवत बाजू आणि ग्राहकांच्या अपेक्षांचा अभ्यास केला. त्यानंतरच त्याने वापरण्यास सोपा आणि प्रभावी परिणाम देणाऱ्या कॉम्प्युटरची निर्मिती केली.
‘मॅकिंटॉश’च्या निर्मितीने कॉम्प्युटर जगतात तर क्रांतीच झाली. विशेषत: ग्राफिकसारख्या कामात इतर उपकरणांचा काही उपयोग होत नव्हता, मॅकिंटॉश मात्र यासाठी उपयुक्त होते. फिल्म निर्माता आणि कलाक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी मॅकिंटॉश कॉम्प्युटर वरदान ठरलं. मग अॅपलद्वारे लहान आकारातील कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करून स्टीव्ह आपल्या उपकरणांच्या सौंदर्याकडेही बारकाईने लक्ष देत असे.
स्टीव्ह जॉब्ज बुद्धिमान तर होताच; पण आपल्या अगाध कल्पनाशक्तीच्या बळावर त्याने कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरपासून ते कॉम्प्युटरच्या निर्मितीपर्यंत आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवला. स्टीव्ह जॉब्ज हा प्रसिद्ध संगीतवृंद बीटल्सचा अनुयायी होता. स्टीव्ह म्हणत असे की, ‘बीटल्सच्या कार्यशैलीतून त्याला नवनिर्मिती आणि व्यवसाय करण्याची दृष्टी मिळाली.’ बीटल्सचे चार सदस्य होते. ते एकमेकांच्या कमकुवत बाजू सतत एकमेकांसमोर मांडत आणि मग त्यातून ते सुंदर संगीत निर्माण करीत असत. स्टीव्हदेखील असेच करीत असे. कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करताना जोपर्यंत त्याला पूर्णत: संतुष्टी मिळत नाही तोपर्यंत तो स्वत:ला त्या कामात झोकून देई. उत्पादनात असणाऱ्या कमतरतेवर त्याचे बारीक लक्ष असे. उत्पादन निर्मितीपासून ते बाजारात त्याची विक्री करेपर्यंत प्रत्येक योजनेवर तो जातीने लक्ष देत असे आणि त्यासाठी दीर्घकालीन रणनीती आखत असे. उत्पादनाची उपयोगिता, त्याची रचना, त्याची सुरक्षितता आणि व्यावहारिक सुविधा इत्यादींविषयी निरंतर शोध घेत असे. अशा प्रकारे अॅपल ही शोध आणि विकासाच्या बाबतीत एक अग्रगण्य कंपनी बनली.
आयपॅडचा शोध आणि निर्मितीच्या माध्यमातून स्टीव्ह जॉब्जने लोकांना जणू संगीताचा खजिनाच बहाल केला. आयफोन म्हणजे फोनमध्ये जणूकाही
कॉम्प्युटरची चमत्कारिक अनुभूतीच. आयपॅडच्या शोधाने तर माहिती तंत्रज्ञानातील सर्वच सुविधा एकाच उपकरणात सामावून घेतल्या. अशा प्रकारे त्याने कॉम्प्युटरला दैनंदिन जीवनात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंप्रमाणे वापरात आणण्यासारखे विकसित केले.
यामुळे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती जगभरात पसरली. आज भारतातही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी किमतीतील कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्यात जे यश मिळाले आहे त्यासाठी स्टीव्ह जॉब्जचे शोध आणि कार्यही तितकेच प्रेरणादायक ठरले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या पुस्तकात तुम्हाला स्टीव्ह जॉब्जची प्रेरक जीवनगाथा वाचायला मिळेल.
– ममता झा
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (15 March 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 9352203216
ISBN-13 : 978-9352203215
Item Weight : 200 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book