Swatantryaveer Savarkar : Vinayak Damodar Savarkar Motivational Biography Book in Marathi (स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी प्रेरणादायी चरित्र पुस्तक) Swatantra Veer Sawarkar Inspirational Books, वीर सावरकर

Swatantryaveer Savarkar : Vinayak Damodar Savarkar Motivational Biography Book in Marathi (स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी प्रेरणादायी चरित्र पुस्तक) Swatantra Veer Sawarkar Inspirational Books, वीर सावरकर

Swatantryaveer Savarkar : Vinayak Damodar Savarkar Motivational Biography Book in Marathi (स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी प्रेरणादायी चरित्र पुस्तक) Swatantra Veer Sawarkar Inspirational Books, वीर सावरकर
Price: ₹99.00
(as of Nov 06, 2023 15:33:56 UTC – Details)


From the Publisher

Swatantryaveer Savarkar

Swatantryaveer SavarkarSwatantryaveer Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

‘काळ्या पाण्या’ची शिक्षा म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.’

“तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण”

अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाजसुधारक होते.

सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘मित्रमेळा अर्थात अभिनव भारत’ची स्थापना केली. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ अशी त्यांची ठाम भूमिका होती.

राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.

——————————————————————————————————————————————————————-

तात्या देवघरात गेले. त्यांनी आपल्या अष्टभुजा देवीला वंदन केले. ‘आई! आता माझे कार्य संपले, माझे जीवन कृतार्थ झाले. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. आता या देहाचे मी विसर्जन करणार आहे. कार्य संपले की समाप्ती करायलाच हवी.’

लहानपणी तात्याने आपल्या देवीजवळ प्रतिज्ञा केली होती – ‘आई! मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरेपर्यंत झुंजत राहील.’ त्या वेळेस त्यांचे वय होते फक्त सोळा वर्षांचे. या प्रतिज्ञेने त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली आणि आता या पवित्र जीवनाची ते समाप्ती करणार होते. आपल्या जीवनाची पूर्ती करणार होते.

मृत्यूलाही इच्छा झाली या महापुरुषाचे, या महान वीराचे दर्शन घ्यायची आणि मृत्यूने हळूहळू भीतभीत तात्याकडे तोंड वळवले आणि तात्याचे तेज पाहून मृत्यूही दीपून गेला. त्याच्याही तोंडून उद्गार निघाले. ‘तात्या धन्य तुझी, हा मी आलोच.’

मृत्यू तात्याच्या जवळ आला आणि तात्याने मृत्यूला दृढ आलिंगन दिले. तात्याची जीवनज्योत मालवली. तात्याने मृत्यूच्या सोबत त्या तेजोमंडळात उडी घेतली आणि तात्याचे तेज त्या दिव्य तेजात मिसळून गेले. मागे राहिला तो फक्त- प्रकाश! प्रकाश! प्रकाश!

देशासाठी आत्मबलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जीवनगाथा.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Fourth edition (15 June 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 120 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203089
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203086
Item Weight ‏ : ‎ 120 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *