Thu. Nov 30th, 2023


Price: ₹197.00
(as of Nov 19,2023 23:18:02 UTC – Details)


From the Publisher

Unf*ck Yourself : Get out of your head and into your life (अनफ*क युअरसेल्फ)

Unf*ck Yourself : Get out of your head and into your life (अनफ*क युअरसेल्फ)Unf*ck Yourself : Get out of your head and into your life (अनफ*क युअरसेल्फ)

चाकोरीत अडकला आहात?

संशयाने पछाडले आहात?

कंटाळवाणे वाटत आहे?

‘अनफ*क युअरसेल्फ’ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की, तुमच्यातल्या खर्‍या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या.

आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात.

तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत. काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालवणे थांबवा; कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वत: आहात.

वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या

महानतेला बंधमुक्त करण्याची हीच वेळ आहे.

“सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणार्‍या; थेट मुद्द्याला हात घालणार्‍या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.”

– संडे हेराल्ड

Unf*ck Yourself : Get out of your head and into your life (अनफ*क युअरसेल्फ)Unf*ck Yourself : Get out of your head and into your life (अनफ*क युअरसेल्फ)

सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणार्‍या; थेट मुद्द्याला हात घालणार्‍या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.

– संडे हेराल्ड

कधी कधी आपल्याला पुढे जाण्यासाठी छोट्याशा मदतीच्या धक्क्याची गरज भासते आणि बर्‍याचदा आपल्या प्रगतिपथावरचा अडथळा आपण स्वत:च असतो. गॅरी बिशप आपल्याला काही युक्त्या आणि सल्ले देतात ज्यायोगे तुम्ही तुमचे अनावश्यक ओझे नष्ट करू शकाल.

– लेक्झिंग्टन हेराल्ड लीडर

हे समंजस मार्गदर्शन तुमच्या डोक्यातील त्या तिरस्करणीय टीकाकारावर नियंत्रण ठेवायला मदत करते आणि तुमच्या मनात स्वत:विषयी आणि आयुष्याविषयी सकारात्मक विचारांची पेरणी करते.

अनफङक युअरसेल्फ या पुस्तकाला सेल्फ-हेल्प या गटात मोडणे म्हणजे त्याचे महत्त्व कमी करणे आहे. त्याऐवजी त्याची स्वमदत/प्रेरणादायक/विनोदी/वैयक्तिक/व्यावसायिक/व्यक्तिमत्त्वविकास/आनंददायी पुस्तकात गणना व्हायला हवी.

– द मॅन्युअल

तुम्हाला कधी असं वाटतं का की, आपण एक हॅमस्टर आहोत. घुशीइतका मोठा; पण निर्बुद्ध असा पांढरा उंदीर जो जीवनाच्या चाकावर वेगाने फिरतो आहे; पण कुठेही पोहोचू शकत नाही

हे लिखाण अशाच लोकांसाठी आहे, जे नेहमी स्वतःच्या पराभवाचं, हरण्याचं स्वगत अनुभवत असतात. संशय, सबबी, पळवाटा यांचा अखंड प्रवाह ज्यांचं रोजचं जगणं खुरटं, कलंकित करत असतो. चराचर सृष्टीकडून तुम्हाला मिळालेली ही संवादात्मक चपराक आहे- तुम्हाला झोपेतून उठवण्यासाठी, तुमच्यातली खरी क्षमता जागवण्यासाठी, दैनंदिन जगण्यात गुंतलेल्या मरगळलेल्या जिवाला बाहेर काढून डौलदारपणे खर्‍या जीवनात परत आणण्यासाठी.

कधीकधी तुमच्या भोवतालची परिस्थिती अजिबातच बदलत नाही. काही वेळा तर ती ठप्प होऊन चक्क थिजून तिचे दगडच बनतात. तुम्ही ज्यासाठी काम करता आहात, जी गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण बनवणार आहे, ती घडलीच नाही तर? मग काय? आणि जरी नंतर कधी ती घडली, तर त्या दिवसापर्यंत तुमचं आयुष्य कसं जाईल? हे पुस्तक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणार आहे.

Unf*ck Yourself Unf*ck Yourself

तुमचा मार्ग आखून घ्या आपल्या जगण्यातलं ध्येय कोणतं आणि सध्या आपण कशा तर्‍हेने जगत आहोत, याचं आपण बारकाईने निरीक्षण करण्यामुळे एक सुंदर गोष्ट घडून येते. त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग कितपत योग्य याचेही मूल्यमापन होत जाते.

जीवनात येणार्‍या हजारो अडथळ्यांकडे एकदा का तुम्ही ‘‘माझी इच्छा, तयारी आहे आणि माझी इच्छा, तयारी नाही’’ अशा दृष्टीने पाहू लागलात, स्वत:ला आणि स्वत:ची परिस्थिती यांना नकारात्मक मतांनी तोलत स्वत:ला कमी लेखण्याचं थांबवलंत, की मग बघा- तुम्ही स्वत: निर्माण केलेले जे अडथळे तुम्हाला सतत मागे खेचत होते, ते क्षणार्धात मोडून पडतील. त्यानंतर मनातला हानिकारक स्वसंवाद आणि मनाची नाटकं- नखरे यांच्या पलीकडे तुम्ही स्वत:ला पाहू लागाल.

Gary John BishopGary John Bishop

गॅरी जॉन बिशप

स्कॉटलंडमध्ये जन्म होऊन तिथेच लहानाचे मोठे झालेले गॅरी1997 मध्ये अमेरिकेला गेले आणि त्यांना व्यक्तिगत विकासाच्या अभ्यासाच्या जणू नव्या वाटाच सापडल्या. विशेषत: ऑण्टोलॉजी(प्राणिमात्रांवर विचार करणाऱ्या) आणि फेनॉमेनॉलॉजी(मानवाच्या आत्मिक उन्नतीबद्दल विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या) या शाखांत त्यांनी अनेक वर्षे कठोर आणि काटेकोरपणे प्रशिक्षण घेतले. नंतर त्यांनी व्यक्तिगत विकासाच्या क्षेत्रामध्ये जगात अग्रेसर असणाऱ्या एका कंपनीत उच्चपदावर काम करण्यास सुरुवात केली. बरीच वर्षे जगातील हजारो लोकांना मार्गदर्शन केल्यानंतर अभ्यास सुरू केला, त्यावेळी ते मार्टिन हैडेगर, हॅन्स जॉर्ज गॅडामर आणि एडमंड हसेर्ल यांच्या तत्त्वज्ञानाने विशेष प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतःची‘अर्बन फिलॉसॉफी’ नावाची कंपनी स्थापन केली.

लोकांची मानसिक क्षमता वाढवून त्यांच्या जीवनात खराखुरा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा गॅरी यांनी जणू वसाच घेतलेला आहे आणि ही तळमळ त्यांना प्रत्येक दिवशी कार्यरत ठेवते. ‘कुणी निंदा कुणी वंदा’ असे त्यांचे धोरण असल्यामुळे त्यांचे विचार अनुसरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत असून त्यांच्या विचारांचा साधेपणा आणि प्रत्यक्ष जीवनात होणाऱ्या उपयोगांनी लोक प्रभावित होत आहेत.

सध्या ते फ्लोरिडा येथे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास आहेत.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

@GARYJOHNBISHOP

GARYJOHNBISHOP.COM

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (9 June 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 296 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203208
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203208
Item Weight ‏ : ‎ 200 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *