Vishwatil Samarthyashali Striya – World Famous Womens Biography Book in Marathi, Charitra Books, मराठी चरित्र पुस्तके

Vishwatil Samarthyashali Striya – World Famous Womens Biography Book in Marathi, Charitra Books, मराठी चरित्र पुस्तके

Vishwatil Samarthyashali Striya – World Famous Womens Biography Book in Marathi, Charitra Books, मराठी चरित्र पुस्तके
Price: ₹99.00
(as of Nov 06, 2023 23:51:10 UTC – Details)


From the Publisher

Vishwatil Samarthyashali Striya by Jyoti Dharmadhikari

Vishwatil Samarthyashali StriyaVishwatil Samarthyashali Striya

जगाच्या पाठीवरील कुठलीही स्त्री भारतीय स्त्रीपेक्षा वेगळी नाही. कारण स्त्री ही एक विश्वभावना आहे. तिची कुटुंबवत्सलता वैश्विक आहे आणि दुर्दैवाने तेवढीच वैश्विक आहे तिला मिळणारी दुय्यमत्वाची वागणूकही. तरीही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वीज बनण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. उपरोेक्त स्त्रियांच्या संदर्भात बोलायचे झाले, तर जिद्द, धडाडी, चिकाटी आणि चिवटपणे लढण्याची वृत्ती हे गुण प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीमध्ये असतात त्याप्रमाणे या स्त्रियांमध्ये तर आहेतच; पण त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये जाणवतो, तो म्हणजे जिंकेपर्यंत हार न मानण्याची अंत:प्रेरणा आणि प्रसंगी एकटीने उभे राहण्याचा आत्मविश्वासही. तोच वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. जगभर विविध ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे दीपस्तंभ उभारणार्‍या या स्त्रियांच्या जीवनकथा वाचकांना आवडतील अशी खात्री वाटते.

– ज्योती धर्माधिकारी

‘प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री उभी असते’, हे आपण वर्षानुवर्ष वाचत आलो आणि ‘पुरूषामागे’ असण्यातच स्त्रियांनी धन्यताही मानली. पण आता स्त्री जर समक्ष असले तर तिचे सामर्थ्य जगासमोर येण्यासाठी आणि ते जगाला उपयुक्त ठरण्यासाठी पुरूषानेही तिच्या पाठीशी राहण्यास काहीच कमीपणा नाही तर मनाचा मोठेपणा आहे. हे लिखाण वाचून स्त्री-पुरूष समानतेचा आणि परस्पर सहाकार्याचा अत्यंत आवश्यक असा नवा विचार नकळत मनात मूळ धरू लागतो.

आज एकविसाव्या शतकातही ‘बापघर आणि आपघर’ – ‘माहेर आणि सासर’ या पारंपारिक व्यवस्थेतच अजूनही बंदिस्त असणार्‍या किंवा स्वत:च्या ेस्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेणार्‍या प्रत्येक स्त्रीला प्रेरक ठरेल, आत्मसन्मानाची जाणीव करून देईल, प्रयत्नांची नवी वाट शोधायला लावील असं हे पुस्तक आहे. आत्माविष्कार करताना कोणत्याही वयाच्या-वंशाच्या-क्षेत्रातील स्त्रीला या 11 स्त्रिया आधारस्तंभ वाटतील, प्रकाशवाट दाखवितील आणि यातच या पुस्तकाची सार्थकता दडलेी आहे, असं मला वाटतं.

– डॉ. रमा मराठे

M.D., C.I.G., M.Sc., Ph.D. (Psychology)

डॉ. वंगारी । आंग सान स्यू ची । मलाला युसुफझाई । डॉ. अँजेला मर्केल । डॉ. मेरी क्यूरी । मदर तेरेसा । रोझा पार्क्स । इंदिरा गांधी । आयजेन पू । ओपरा विनफ्रे जेनेट मॉक ।

डॉ. ज्योती धर्माधिकारीडॉ. ज्योती धर्माधिकारी

डॉ. ज्योती धर्माधिकारी

पदवी : बी. एस्सी. (फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स)पदव्युत्तर शिक्षण : एम.ए. (इंठाजी), बी. एड., पीएच.डी.अध्यापनकार्याचा सव्वीस वर्षांचा अनुभव. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील अध्यापनानंतर 1997 पासून पदवी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत.विद्यापरिषद सदस्य (इंठाजी, पदव्युत्तर विभाग), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.2017 यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानासाठी ’प्रिझम’ या ललित-लेखसंठाहाची निवड.’प्रिझम’ या ललित- लेखसंठाहाला ’आचार्य भानूकवी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’.विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये सातत्याने वाङ्मय संशोधनपर लेखन.वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांसाठी विपुल ललित लेखन, पुस्तक परीक्षण आणि समीक्षण.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंठाजी परिषदांमध्ये संशोधन पत्रिकांचे वाचन. विविध संकलित पुस्तकांमध्ये संशोधन पत्रिका समाविष्ट.मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा इंठाजी जगताला परिचय करून देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय इंठाजी जर्नल्समध्ये सातत्याने लेखन.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2018); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 240 pages
ISBN-10 ‏ : ‎ 935220204X
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202041
Item Weight ‏ : ‎ 230 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *